मुंबई -बॉलिवूडमध्ये एकीकडे काही कलाकार आपल्या लिंकअपच्या चर्चामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. तर, दुसरीकडे मात्र काही कलाकार आपले मार्ग वेगळे करत आहेत. मागच्या वर्षी अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या पतीला घटस्फोट देत असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तर, आता आणखी एक जोडी एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचे समोर आले आहे.
आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणारी ही जोडी म्हणजे अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी हे आहेत. दोघेही एकमेकांपासून ३ वर्षांपासून वेगळे राहत होते. मात्र, आता त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा -'पिया तोसे नैना लागे', पाहा जान्हवी कपूरचा डान्स व्हिडिओ