मुंबई- गायक सोनू निगम यांनी नुकतेच रक्तदान केले. तरीही त्यांवर काही नेटिझनसनी टीकेची झोड उठवली आहे. रक्तदान करताना त्याने मास्क लावलेला नव्हता.
६ मे रोजी सोनूने भारतातील प्रत्येक व्यक्तीस लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन केले. कोविडच्या दुसऱ्या लाटेतरक्ताची अधिक गरज पडणार आहे असे सोनूला वाटते. अमित साटम यांच्या आदर्श फाउंडेशनतर्फे जुहू येथील विद्यानिधी परिसरातील भारतमाता हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोनूने केले. यावेळी सोनू निगमने रक्तदान शिबिरात रक्त आणि ऑक्सिजन कॅनिट दान केले आणि आपल्यावर संकट येईपर्यंत प्रतीक्षा करू नये असे आवाहन सर्वांना केले.
सोनूने आपल्या फेसबुक पेजवर रक्तदान मोहिमेचा व्हिडिओ शेअर केला असता, अनेकांनी रक्तदान करताना त्याने मास्क घातला नव्हता यावरुन टीका करायला सुरुवात केली. यामुळे अडखळलेल्या सोनूने ट्रोलर्सना उत्तरही दिले आहे.