मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने घरीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर त्याने #AskSRK हा हॅशटॅग वापरून चाहत्यांशी संवाद साधला. या माध्यमातून त्याला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. त्यापैकीच एका प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने लॉकडाऊनमधून काय धडा घेतला हे सांगितले आहे.
लॉकडाऊनमधून किंग खानने घेतला हा धडा, वाचा ट्विट - Srk in lockdown
शाहरुखने सोशल मीडियावर #AskSRK हा हॅशटॅग वापरून चाहत्यांशी संवाद साधला.
देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे २४ तास व्यग्र असणारे कलाकार देखील घरी बसून आहेत. शाहरुखला एका चाहत्याने याच संबंधी प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना शाहरुख म्हणाला की सध्या कामाची गती मंदावली आहे. आपल्याला एखाद्या वेळी आपली गती कमी करावी लागते. सध्या तिचं वेळ आहे. सध्या आपण निसर्ग आणि आयुष्याला अनुभवत आहोत. सतत दिवसरात्र काम करण्यापेक्षा या वेळेचा सदुपयोग करणं चांगलं आहे, असे उत्तर त्याने दिले आहे.
पुढे कोरोना विषाणूच्या संकटातून आपण लवकर बाहेर येऊ, अशी प्रेरणा त्याने दिली. त्यासाठी त्याने चाहत्यांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूच्या लढाईसाठी शाहरुखने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 25000 सुरक्षा किट्सची मदत केली आहे. तसेच त्याने मुंबई येथील त्याच्या ऑफिसचा भाग क्वारंटाइन केंद्र बनवण्यासाठी दिला आहे. याशिवाय त्याच्या रेड चीलीज एंटरटेनमेंट अंतर्गत त्याने पीएम आणि सीएम रिलीफ फंडमध्ये आर्थिक मदत देखील केली आहे.