मुंबई - बॉलिवूड भाईजान सलमान दरवर्षी ईदच्या दिवशी आपल्या चाहत्यांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत असतो. यंदा तो संजय लिला भन्साळींच्या इंशाअल्लाह चित्रपटातून ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, काही वेळापूर्वीच ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची घोषणा केली गेली.
'इंशाअल्लाह' किंवा 'किक २' असणार भाईजानकडून चाहत्यांसाठी ईदची भेट? - जॅकलीन फर्नांडीस
सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्या मुख्य भूमिका असलेल्या किक चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच किक २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाईजानचा हाच सिनेमा २०२० च्या ईदला प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
भाईजानच्या या ट्विटनंतर चाहत्यांची पूर्णपणे निराशा झाली होती. अशात आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्या मुख्य भूमिका असलेल्या किक चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच किक २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता भाईजानचा हाच सिनेमा २०२० च्या ईदला प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटलं आहे. असं झाल्यास अक्षयच्या लक्ष्मी बॉम्ब आणि सलमानच्या किक २ची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळेल. मात्र, प्रोडक्शन हाऊसनं याबद्दलची घोषणा करणं अद्याप बाकी आहे. ही बातमी भाईजानच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे, यात काही शंका नाही.