मुंबई- कियारा अडवाणीनं २०१४ मध्ये आलेल्या 'फगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिला खरी ओळख मिळवून दिली 'एम.एस. धोनी' या चित्रपटानं. सध्या कियारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आपल्या 'कबीर सिंग' या चित्रपटामुळे, या चित्रपटातील तिचा रोल कमी वेळाचा असला तरी याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. यानंतर आता ती आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.
कबीर सिंगच्या निरागस प्रितीनंतर आता बिनधास्त रॉकस्टार बनणार कियारा - Guilty
नेटफ्लिकसच्या 'गिल्टी' या चित्रपटात कियाराची वर्णी लागली आहे. याआधीही तिने नेटफ्लिकसच्या 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटात भूमिका साकारली आहे. यात तिच्यासोबत विकी कौशलही झळकला होता.
नेटफ्लिकसच्या 'गिल्टी' या चित्रपटात कियाराची वर्णी लागली आहे. या चित्रपटात ती रॉकस्टारची भूमिका साकारणार आहे. याआधीही तिने नेटफ्लिकसच्या 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटात भूमिका साकारली आहे. यात तिच्यासोबत विकी कौशलही झळकला होता. 'गिल्टी' या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे करण्यात येणार आहे.
नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या ट्विटरवरून या चित्रपटाची माहिती दिली आहे. नेटफ्लिकसच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या चित्रपटात कियाराशिवाय आणखी कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.