मुंबई - अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या 'कबीर सिंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिनं अनेक चित्रपट साईन केले असल्याचं म्हटलं जात आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे 'इंदु की जवानी'. आता या चित्रपटातील अभिनेत्याचं नावही समोर आलं आहे.
कियाराच्या 'इंदु की जवानी'मध्ये आदित्य सीलची वर्णी, शेअर केली पोस्ट - student of the year 2
या चित्रपटात कियाराच्या अपोझिट आदित्य सीलची वर्णी लागली आहे. आदित्यने नुकतंच स्टूडंट ऑफ द ईअर २ चित्रपटात भूमिका साकारली होती. कियाराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
या चित्रपटात कियाराच्या अपोझिट आदित्य सीलची वर्णी लागली आहे. आदित्यने नुकतंच स्टूडंट ऑफ द ईअर २ चित्रपटात भूमिका साकारली होती. कियाराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. आदित्य सील इंदु की जवानी चित्रपटात तुझं स्वागत आहे. संपूर्ण टीम या खास प्रवासात होणाऱया तुझ्या प्रवेशासाठी उत्सुक आहे, असं कियाराने म्हटलं आहे.
'इंदु की जवानी' या चित्रपटाच्या शुटिंगला सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होईल. बंगाली पटकथालेखक अबीर सेनगुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांचा हा पहिलाच बॉलिवूड दिग्दर्शनीय चित्रपट आहे. मोनीषा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, निरांजन अय्यंगार आणि रेयान स्टेफन हे सहाय्यक निर्माते आहेत.