महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा व्हिडिओ, बॅकलेस गाऊनमध्ये कियाराअडवाणीचा हॉट लूक - मॅगझिन कव्हरवर कियारा

कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटोशूट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. उघडी पाठ आणि चमकदार पोशाखात अभिनेत्री कियारा खूपच आकर्षक दिसत आहे.

कियारा अडवाणी पोस्ट
कियारा अडवाणी पोस्ट

By

Published : Feb 5, 2022, 2:05 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने सोशल मीडियावर एका जबरदस्त व्हिडिओद्वारे तिच्या चाहत्यांना ट्रिट दिली आहे. अभिनेत्रीने पडद्यामागचा एक व्हिडिओ शेअर केला आहे . यामध्ये तिची पाठ उघडी दिसत असून तिने चमकदार पोशाख घातलेला दिसत आहे. दुसर्‍या पोस्टमध्ये, कियाराने हादेखील खुलासा केला आहे की ती सेटवर परत आली आहे परंतु कोणत्या प्रोजेक्टसाठी याचा उल्लेख तिने केलेला नाही.

शनिवारी कियाराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटोशूट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. उघडी पाठ असलेल्या या व्हिडिओत कियारा उंच स्लिट असलेल्या चमकदार पोशाखात आकर्षक दिसत आहे. कियाराने बेअरबॅक लूक दाखवला असला तरी याबद्दल अधिक भाष्य केलेले नाही.

मने महिलांच्या फॅशन मासिकाच्या मुखपृष्ठावरही स्थान मिळवले आहे. नवीन मॅगझिन कव्हरवर कियारा फॅशन लेबल अस्तुचा काळा कॉकटेल ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. मॅगझिन शूटमधील आणखी एका फोटोमध्ये कियारा ऑफ-शोल्डर मॅजेंटा रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

कियारा अडवाणी पोस्ट

दरम्यान, ती "सेटवर परत आली आहे" हे तिच्या फॉलोअर्सना कळवण्यासाठी अभिनेत्री कियाराने इन्स्टाग्राम स्टोरीजवर देखील पोस्ट केले आहे. तथापि, तिने संदिग्धता कायम ठेवली आहे आणि ती सध्या कोणत्या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे हे उघड केले नाही. अभिनेत्री आगामी ''जग जुग्ग जीयो'' आणि ''भूल भुलैया २'' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा -अभिषेक बच्चनने सुरू केले घूमरचे शूटिंग : 'ही तर वाढदिवसाची सर्वोत्तम भेट'

ABOUT THE AUTHOR

...view details