मुंबई- सिद्धार्थ आणि परिणीती चोप्राची 'जबरिया जोडी' पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित 'जबरिया जोडी' चित्रपटातून हे कलाकार पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. अशात आता यातील एक भावनिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'की होंदा प्यार', अरिजीत सिंगच्या आवाजातील 'जबरिया जोडी'चं नवं गाणं - parineeti chopra
काही कारणानं परिणीती आणि सिद्धार्थच्या नात्यात आलेल्या दुराव्यावर चित्रीत केलेल्या या नव्या गाण्याचं शीर्षक 'की होंदा प्यार' असं आहे. यात दोघेही एकमेकांसोबतच्या जुन्या आठवणींत रमलेले दिसतात. या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे.
याआधी प्रदर्शित झालेल्या खडके ग्लासी, जिला हिलेला, ढूंढे अखियां, या गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता, काही कारणानं परिणीती आणि सिद्धार्थच्या नात्यात आलेल्या दुराव्यावर चित्रीत केलेल्या या नव्या गाण्याचं शीर्षक 'की होंदा प्यार' असं आहे. यात दोघेही एकमेकांसोबतच्या जुन्या आठवणींत रमलेले दिसतात. या गाण्याला अरिजीत सिंगनं आवाज दिला आहे.
सिनेमात परिणीती बबली यादव तर सिद्धार्थ अभय सिंह नावाच्या तरूणाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा, चंदन रॉय सान्याल या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. प्रशांत सिंग यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.