मुंबई- सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि बादशाह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'खानदानी शफाखाना' चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Khandani Shafakhana trailer: संपत्तीसाठी सेक्स क्लिनीक चालवणाऱ्या सोनाक्षीची कथा - varun sharma
'खानदानी शफाखाना' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी सोनाक्षीसमोर ६ महिने त्यांचं सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते, याचीच कथा ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी सोनाक्षीसमोर ६ महिने त्यांचं सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते. अशात सोनाक्षी कशा प्रकारे या गोष्टी हाताळते आणि यादरम्यान होणारे अनेक विनोदी संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.
चित्रपटाची कथा नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी असल्यानं प्रेक्षकांना काहीसं वेगळेपण या चित्रपटात पाहायला मिळेल हे नक्की. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे. येत्या २६ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.