महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रभूदेवाच्या 'खामोशी'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित - horror

खामोशी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अंगावर शहारे उभा करणारा हा २ मिनीट ७ सेकंदांचा थरारक ट्रेलर आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.

'खामोशी'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

By

Published : May 15, 2019, 3:26 PM IST

मुंबई- दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'खामोशी' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

अंगावर शहारे उभा करणारा हा २ मिनीट ७ सेकंदांचा थरारक ट्रेलर आहे. या ट्रेलरमध्ये प्रभूदेवा अनेकांचे खून करताना दिसत आहे. मात्र, हे करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच उघड होईल. थोडक्यात हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.

या ट्रेलरमध्ये प्रभूदेवाचे रौद्र रूप पाहायला मिळतं आहे, तर तमन्ना ही घाबरलेल्या अवस्थेत दिसतेय. चक्री टॉलेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ३१ मे रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. हा एक हॉरर चित्रपट असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details