महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ईशान-अनन्याच्या 'खाली पिली'च्या चित्रीकरणाला सुरुवात, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - भारत'

अनन्याने नुकतंच आपल्या 'पती पत्नी और वो' सिनेमाचं लखनौमधील चित्रीकरण पूर्ण केलं. यानंतर आता ती खाली पिलीच्या चित्रीकरणात व्यग्र झाली आहे. ईशान आणि अनन्याच्या जोडीला पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

'खाली पिली'च्या चित्रीकरणाला सुरुवात

By

Published : Sep 12, 2019, 8:03 AM IST

मुंबई- 'धडक' या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता ईशान खट्टर या चित्रपटानंतर फारसा चर्चेत राहिला नव्हता. अशात आता ईशानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ईशानने नुकतंच 'खाली पिली' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यात त्याच्या अपोझिट अभिनेत्री अनन्या पांडे झळकणार आहे.

सिनेमाच्या चित्रीकरणाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. अनन्याने नुकतंच आपल्या 'पती पत्नी और वो' सिनेमाचं लखनौमधील चित्रीकरण पूर्ण केलं. यानंतर आता ती खाली पिलीच्या चित्रीकरणात व्यग्र झाली आहे. अनन्या 'स्टुडंट ऑफ द ईअर २' या सिनेमातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये झळकली.

'सुलतान', 'टायगर जिंदा हैं' आणि 'भारत'सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तर मकबूल खान यांचं दिग्दर्शन असणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. ईशान आणि अनन्याच्या जोडीला पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details