कन्नड अभिनेता यश याच्या ‘केजीएफ: चॅप्टर 2’ या चित्रपटाच्या रिलीजची चाहत उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले असून यातयात सुपरस्टार यशचा करारी लूक दिसत आहे.
भव्य पोशाखात परिधान केलेला, यश या पोस्टरमध्ये वाढलेल्या दाढीसह कणखर दिसत आहे. त्याचे आसनही दिमाखदार असून भडकलेली ज्वाला पोस्टरवर दिसत आहे. केजीएफच्या सिक्वेलबद्दलची उत्सुकता वाढवणारे हे पोस्टर आहे.
यापूर्वी संजय दत्तने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरही सिनेमाच्या रिलीजच्या तारखेतील बदलाविषयी अपडेट शेअर केले होते. "हॉल जेव्हा गँगस्टर्सने भरुन जाईल तेव्हाच राक्षसांचे आगामन होईल. त्याच्या आगमनाची नवी तारीख लवकरच कळेल'', असे संजय दत्तने लिहिले होते.