मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा आज ६० वा वाढदिवस. याच निमित्ताने 'केजीएफ २'मधील संजू बाबाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हे पोस्टर प्रेक्षकांची चित्रपटातील संजयच्या पात्राबद्दलची उत्कंठा वाढवणारं आहे. या चित्रपटात संजय अधिरा नावाचं पात्र साकारणार आहे.
'केजीएफ २'मधील संजू बाबाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, साकारणार अधीराची भूमिका - पोस्टर प्रदर्शित
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. यानंतर आता संजयच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दुसरं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आपला फर्स्ट लूक ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत संजयने चित्रपटासाठी दिग्दर्शकाचे आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. यानंतर आता संजयच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दुसरं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आपला फर्स्ट लूक ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत संजयने चित्रपटासाठी दिग्दर्शकाचे आभार मानले आहेत. यासोबतच ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्साही आणि आनंदी असल्याचे त्याने म्हटले आहे.
संजय या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. कन्नड सुपरस्टार यश याची मुख्य भूमिका असलेला केजीएफचा पहिला भाग काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.