महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जपानी प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी खिलाडी 'कुमार' सज्ज, शेअर केला फोटो - highest opener

१६ ऑगस्टला केसरी हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार होणार आहे.अक्षय कुमारनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 'केसरी' हा चित्रपट सारागढीच्या लढाईवर आधारित आहे.

जपानी प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी खिलाडी कुमार सज्ज

By

Published : Jun 24, 2019, 8:04 PM IST

मुंबई- अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या केसरी चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या यानंतर आता हा चित्रपट जपानमधील प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. १६ ऑगस्टला हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 'केसरी' हा चित्रपट सारागढीच्या लढाईवर आधारित आहे. २१ शिख सैनिकांनी १० हजार अफगाणींविरोधात दिलेल्या लढ्याची कथा ‘केसरी’मध्ये आहे.

अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे. तर परिणीती चोप्राने यात अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.या चित्रपटानं भारतात केवळ ७ दिवसातच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. अशात आता जपानी प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details