मुंबई - अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) ) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की हे जोडपं 7 ते 9 डिसेंबर दरम्यान कोणत्यातरी तारखेला लग्न करणार आहे, मात्र याच दरम्यान विकी कौशलची मावस बहीण डॉ. उपासना वोहरा हिने एका वृत्तपत्राशी संवाद साधताना चाहत्यांसाठी धक्का देणारे विधान केले आहे.
विकी कौशलच्या मावस बहिणीने सांगितले आहे की तिचा भाऊ आणि कॅटरिना कैफ लग्न करत नाहीत. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेली ही चर्चा केवळ अफवा आहे. लग्नासारखा कोणताही सीन असेल तर त्याची घोषणा करणार असल्याचे तिनी सांगितले. डॉ. उपासना (Dr. Upasana Vohra) यांनी सांगितले की, अलीकडेच तिची विकी कौशलसोबत चर्चा झाली. त्याने स्वतः सांगितले की असे काही नाही. यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही, परंतु सध्या लग्न होत नाही हे खरे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. उपासना वोहराचे (Dr. Upasana Vohra) लग्न या वर्षी जुलैमध्ये झाले होते, त्यानंतर विकी कौशलने आपल्या भावासोबत उपासना वोहराच्या लग्नाला हजेरी लावली होती आणि डोलीला खांदा दिला होता. मात्र, लग्नाची गुप्तता राखण्यासाठी उपासनाने असे म्हटल्याचे बॉलिवूड इंडस्ट्रीतील जाणकारांचे मत आहे.