महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कॅटरिनाच्या बहिणीचं बॉलिवूड पदार्पण, आयुष शर्मासोबत करणार स्क्रीन शेअर - चित्रपट

आयुष शर्मा आणि इसाबेलचा एक फोटो शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या नव्या जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

कॅटरिनाच्या बहिणीचं बॉलिवूड पदार्पण

By

Published : Aug 3, 2019, 9:47 AM IST

मुंबई- बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यांनं अनेकांची मनं जिंकली. आता यापाठोपाठ चिकनी चमेलीची बहिणही बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज झाली आहे. इसाबेल कैफच्या पहिल्या चित्रपटाची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

आपल्या पहिल्या चित्रपटात ती लव्हयात्री फेम आयुष शर्मासोबत झळकणार आहे. 'क्वाथा' असं या सिनेमाचं शीर्षक असणार आहे. करण ललित बुतानी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तर सुनिल जैन, ओमप्रकाश भट्ट, आदित्य जोशी, अलोक ठाकूर आणि सुजय शंकरवार यांची निर्मिती असणार आहे.

आयुष शर्मा आणि इसाबेलचा एक फोटो शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या नव्या जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. सिनेमाबद्दलच्या इतर गोष्टी अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details