मुंबई- 'सत्ते पे सत्ता' या १९८२ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलं. यानंतर मूळ चित्रपटात अमिताभ आणि हेमा मालिनी यांनी साकारलेली पात्र रिमेकमध्ये कोण साकारणार? याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'सत्ते पे सत्ता' रिमेक; हेमा मालिनींचा रोल साकारणार कॅटरिना? - hema malini
या सिनेमात अभिनेता हृतिक रोशन अमिताभ यांच्या जागी झळकणार आहे, तर त्याच्या अपोझिट दीपिका पदुकोणची वर्णी लागली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपट निर्मात्यांनी आता या जागी कॅटरिना कैफची निवड केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्मात्यांनी या रोलसाठी अनेक अभिनेत्रींचा विचार केला होता. ज्यानंतर कॅटरिनाचं नाव निश्चित केलं गेलं. दरम्यान अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खान करणार असून रोहित शेट्टीची निर्मिती असणार आहे.