मुंबई -बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरनंतर आता चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षय कुमारसोबत अजय देवगन, रणवीर सिंग आणि कॅटरिना कैफ यांचीही झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. आता कॅटरिना आणि अक्षयचा एकत्र लुक असलेलं 'सूर्यवंशी'चं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
कॅटरिना कैफने 'सूर्यवंशी' चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय आणि कॅटरिनावर चित्रीत झालेले 'टीप टीप बरसा पानी' हे गाणं देखील पाहायला मिळणार आहे. या गाण्याचाही प्रेक्षकांना आतुरता आहे.