महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लॉकडाऊन : आत्मपरीक्षण करण्यासाठी मिळालेली संधी - कॅटरिना कैफ - pandemic

कोरोना संक्रमणामुळे अनेक निराशेचे विचार येत असतात. मात्र ही आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण ज्या चुका केल्यात त्या पुन्हा घडणार नाहीत, याचा विचारही व्हायला हवा, असे मत कॅटरिना कैफने व्यक्त केलंय.

Katrina Kaif
कॅटरिना कैफ

By

Published : May 14, 2020, 3:20 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग झुकले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झालाय. विशेषतः जेव्हा सामान्य लोकांचा विचार केला तर त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफलादेखील याहून वेगळे वाटत नाही.

"महामारीनंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे आपले आयुष्य किती सुंदर आहे आणि आपण त्याकडे कसे पाहतो याचे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली आहे. वाढत्या केसेसचा विचार करता आपल्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढली पाहिजे अशी जीवनशैली स्वीकारण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. आयुष्याकडे पाहण्याचा अशा प्रकारे माझा दृष्टीकोन बदलला आहे,'' असे कॅटरिनाने सांगितले.

लॉकडाऊनदरम्यान चिंता कशी नियंत्रित करावी याविषयी काही टिप्स तिने शेअर केल्या आहेत.

''मी हा विचार करुन चकित होऊन जाते की, आयुष्य रुळावर कधी येणार. परंतु जग ज्या परिस्थितीचा सामना करीत आहे त्याचा विचार करुन समजूनही घेते. अशा परिस्थितीत तणाव हा एक मुद्दा आहे. सर्वांनी शांत रहावे, ध्यान करावे किंवा योगा करावा आणि याच्या उत्तम पैलूंबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करा. आगामी काळात येणाऱ्या गोष्टींचा विचार करा. पर्ययावरणाबद्दल अगोदर केलेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत. जेव्हा मी निराश होते तेव्हा ध्यान किंवा योगा करते. स्वतःला खूश ठेवण्यासाठी चित्रपट आणि शो पाहते.'', असेही ती पुढे म्हणाली.

ABOUT THE AUTHOR

...view details