महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लग्नानंतर कॅटरिना कैफ शुटिंग सेटवर परतली, फोटो व्हायरल - विकी कौशल शूटिंगसाठी इंदूरला रवाना

कौशल कुटुंबातील मोठी सून कॅटरिना कैफही कामावर परतली आहे. कॅटरिना कैफचे शूटिंग सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

कॅटरिना कैफ
कॅटरिना कैफ

By

Published : Dec 24, 2021, 10:03 PM IST

मुंबई- कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे नवविवाहित जोडपे लग्नानंतर पुन्हा एकदा कामाला लागले आहे. गेल्या आठवड्यात विकी कौशल शूटिंगसाठी इंदूरला रवाना झाला होता. आता लग्नाच्या दोन आठवड्यांनंतर कौशल कुटुंबातील मोठी सून कॅटरिना कैफही कामावर परतली आहे. कॅटरिना कैफच्या शूटिंग सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये कॅटरिना कैफ चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवनसोबत उभी असलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. कॅटरिनाने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे आणि केशरी श्रग घातला आहे. कॅटरिनाने केस मोकळे सोडले असून सेटवर ती दिग्दर्शकाशी बोलताना दिसत आहे.

लग्नानंतर कॅटरिना कैफ शुटिंग सेटवर परतली

कॅटरिना-विक्कीचे राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी शाही लग्न झाले होते. अलीकडेच कॅटरिना कैफने रविवारी पती विकी कौशलसोबत मुंबईतील जुहू येथील तिच्या नवीन घरात प्रवेश केला. गृहप्रवेश पूजेला संपूर्ण कौशल परिवार उपस्थित होता. आता विकी आणि कॅटरिना त्यांच्या खासगी घरात कुटुंबापासून वेगळे राहत आहेत, तिथून कॅटरिनाने एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

कॅटरिना कैफने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने पती विकी कौशलचा हात हातात धरला आहे. कॅटरिनाचे हात लग्नात काढलेल्या मेहंदी आणि बांगड्यांनी सजलेले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'होम' असे लिहिले आहे.

हेही वाचा -सुष्मिता सेनने केलेल्या ब्रेकअपच्या घोषणेवर रोहमन शॉलची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details