मुंबई- कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री बंद आहे. सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ स्वतःला समाजापासून अलिप्त ठेवून आहेत. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांनी आपले छंद जपायला सुरुवात केली आहे. त्यांचे हे छंद सोशल मीडियावरून ते चाहत्यांना दाखवतही आहेत. अशात प्रसिध्द कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरने रेखाटलेले चित्र सध्या चर्चेत आहे.
सुनिल ग्रोव्हरने बनवले कॅटरिना कैफचे पेंटिंग, पहाल तर तुम्ही हसाल - कॅटरिना कैफचे पेंटिंग
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकांउटवर एक मजेशीर चित्र शेअर केले आहे. हे चित्र कॅटरिना कैफचे असल्याचा दावा त्याने केलाय. सध्या याची भरपूर चर्चा सोशल मीडियात आहे.
![सुनिल ग्रोव्हरने बनवले कॅटरिना कैफचे पेंटिंग, पहाल तर तुम्ही हसाल sunil grover](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6901890-579-6901890-1587577544801.jpg)
सुनिल ग्रोव्हरने आपल्या सोशल मीडियावरून एक चित्र प्रसिध्द केलंय. हे चित्र कॅटरिना कैफचे आहे, असे सुनिलचे म्हणणे आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''लॉकडाऊनने किती कवी, शेफ बनवले. एका पेंटरचे उदाहरण इथे आहे.''
मजेशीर गोष्ट म्हणजे सुनिलने रेखाटलेले कॅटरिनाचे चित्र कुठल्याही अँगलने तिच्यासारखे दिसत नाही. सुनिल नेहमीच मिश्कीली करीत असतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे. त्याच्या या चित्राला प्रचंड प्रतिसाद चाहत्यांनी दिलाय. काही वेळातच या चित्राला २७ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.