महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रीराम राघवनच्या आगामी चित्रपटात कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपतीची जोडी? - कॅटरिना कैफ आगामी 'सुर्यवंशी' या चित्रपटात

अभिनेता कॅटरिना कैफ चित्रपट निर्माते श्रीराम राघवनच्या आगामी दिग्दर्शकीय चित्रपटात एक सुंदर भूमिका साकारणार आहे. अद्याप शीर्षक ठरले नसलेल्या या चित्रपटात तामिळ सुपरस्टार विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Katrina Kaif bags Sriram Raghavan's next
कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती

By

Published : Jan 12, 2021, 3:24 PM IST

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने आणखी एक रंजक चित्रपट निवडला आहे. अभिनेता श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपटात ती दक्षिणेचा सुपरस्टार विजय सेतुपती याच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवली गेली असली तरी 'अंधाधून' चित्रपट निर्मात्याने विजय आणि कॅटरिना एकत्र काम करणार असल्याचा खुलासा केलाय. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. राघवन यांनी वरुण धवनसोबत 'इक्कीस' हा एक बिग बजेट चित्रपट करायचे ठरवले होते. परंतु विजय सेतुपती आणि कॅटरिनासोबत चित्रपट निर्मिती करणार असल्यामुळे 'इक्कीस'ची निर्मिती मागे ठेवली आहे.

चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील समजलेला नसला तरी राघवन आणि विजय सेतुपती एकत्र काम करणार असल्यामुळे एक उत्सुकता निर्माण झाली आहे. २०१८ मध्ये गाजलेल्या 'अंधाधून' या राष्ट्रीय पुरस्कारानंतर राघवन यांच्याबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

दरम्यान, त्यानंतर कॅटरिना कैफ आगामी 'सुर्यवंशी' या चित्रपटात झळकणार आहे. यात तिची जोडी अक्षय कुमारसोबत आहे. याशिवाय तिच्याकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या भूमिका असलेला हॉरर-कॉमेडी 'फोन भूत' देखील आहे. अली अब्बास जफरचा सुपरहिरो फिल्म 'सुपर सोल्जर'मध्ये कॅटरिना काम करणार आहे.

हेही वाचा- टाळेबंदीमध्ये जन्मलेली ‘प्रेम-लग्न’कथा 'लॉकडाऊन लग्न'!

ABOUT THE AUTHOR

...view details