मुंबई - बॉलिवूडची 'चिकनी चमेली' कॅटरिना कैफ (Katrina kaif) आणि अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. कॅटरिना कैफ ही वय आणि कमाईमध्ये विकी कौशलपेक्षा पुढे आहे. अशा परिस्थितीत, आम्ही कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या कमाई आणि एकूण संपत्तीबद्दल (Katrina kaif and Vicky Kaushal net worth) तुम्हाला माहिती देत आहोत..
कॅटरिनाचा स्टारडम
कॅटरिना चित्रपटांव्यतिरिक्त आलिशान आणि विलासी जीवन जगते. कॅटरिना तिच्या सात बहिणींमध्ये सर्वाधिक कमाई करणारी मुलगी आहे. कॅटरिना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे आणि जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती एका चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये मानधन घेते. कॅटरिनाने एकदा नव्हे तर पाच वेळा 'वर्ल्ड सेक्सीस्ट वुमन'चा किताब पटकावला आहे.
कॅटरिनाची कमाई
त्याचवेळी, फोर्ब्स मासिकानुसार, 2017 पासून सलग तीन वर्षे जगभरातील 100 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये कॅटरिना कैफचाही समावेश करण्यात आला आहे. 2019 मध्ये ती 23 व्या क्रमांकावर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफची वार्षिक कमाई 23.64 कोटी रुपये आहे. कॅटरिना एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ६ ते ७ कोटी रुपये घेते. एकूणच, कॅटरिना कैफकडे 220 कोटी रुपयांची संपत्ती आहे.