महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'लव्ह आज कल'च्या प्रमोशनमध्ये रघुच्या ड्रेसमध्ये अवतरला कार्तिक आर्यन - रघुच्या ड्रेसमध्ये अवतरला कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन सध्या 'लव्ह आज कल'च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. तो या सिनेमात रघु ही राजस्थानी व्यक्तीरेखा साकारत आहे. याच रघुच्या ड्रेसमध्ये तो जयपूरमध्ये दिसला.

Kartik dresses up as character Raghu
कार्तिक आर्यन

By

Published : Feb 6, 2020, 7:24 PM IST

मुंबई - 'लव्ह आज कल' चित्रपटाचे प्रमोशन अतिशय वेगळ्या पातळीवर सुरू आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन रघु ही व्यक्तीरेखा साकारत आहे. १९९० च्या दशकातील फॅशनमधला हा रघु जयपूर प्रमोशनमध्ये दिसला. त्यामुळे प्रमोशन अत्यंत रंगतदार झाले.

रघुच्या व्यक्तीरेखेतील कार्तिक आर्यनचा व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

त्याने उभ्या रंगीत पट्ट्या असलेला जुन्या फॅशनचा शर्ट आणि ढगळ पॅन्ट परिधान केलीय. त्याने ९० च्या दशकातील गाण्यावर प्रमोशनमध्ये एन्ट्री घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

''खम्मा गाणी पधारे. #रघु के देस मिलीए राजस्थान के रघु से. आज जयपूरमध्ये # लव्ह आज कल,'' असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय.

'लव्ह आज कल' हा चित्रपट सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचाच सिक्वेल आहे. सैफ अली खानची मुलगी असलेल्या सारा अली खानला या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. साराने यापूर्वी 'केदारनाथ' आणि 'सिंबा' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची दमदार चुणूक दाखवली होती.

या सिनेमात कार्तिक आर्यनच्या दुहेरी भूमिकेची झलक पाहायला मिळते. आजच्या पीढीच्या नातेसंबधांवर हा चित्रपट भाष्य करीत आहे. दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

आपल्या करिअरविषयी सजग असलेली मुलगी आणि तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर यांची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच एका मध्यमवर्गीय मुलीचीही यामध्ये कथा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सैफ अली खानच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाप्रमाणेच असणार का? हे मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.

१४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details