मुंबई - बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन ने कोरोनाशी लढणाऱ्या योध्यांची मुलाखत घेण्यासाठी एक सीरिज लाँच केली आहे. कोकी पुछेगा असे या सीरिज चे नाव आहे.
यूट्यूबच्या माध्यमातून तो आपली सीरिज प्रदर्शित करणार आहे. त्याची एक झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कोकी हे कर्तिकचे निक नेम आहे. त्यामुळे त्याने याच नावाने ही सीरिज सुरू केली आहे. या सीरिजचा पहिला भाग देखील त्याने शेअर केला आहे.
लॉकडाऊन दरम्यान कार्तिक नेहमीच चाहत्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करतो. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तो प्यार का पंचनामा स्टाईलमध्ये नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना दिसतो. या व्हिडिओची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली होती. त्यांनी देखील कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
कार्तिकने पीएम रिलीफ फंडमध्ये आर्थिक मदत देखील केली आहे. तसेच आता तो 'कोकी पुछेगा' या सीरिजच्या द्वारे कोरोनाशी लढणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती घेताना दिसणार आहे.