कार्तिकने रिक्रिएट केला हृतिकच्या चित्रपटातील सीन, पाहा व्हिडिओ - kartik aryan news
कार्तिकने त्याच्या व्हिडिओ मध्ये मजेदार फिल्टर देखील वापरले आहे. त्यामुळे त्याचा चेहरा शरिरापेक्षा मोठा दिसतो.
![कार्तिकने रिक्रिएट केला हृतिकच्या चित्रपटातील सीन, पाहा व्हिडिओ kartik aryan recreate hritik roshan's koi mil gaya scene](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6851682-thumbnail-3x2-ka.jpg)
मुंबई - बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन नेहमी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतो. सध्या तो त्याच्या अशाच एका व्हिडिओ मुळे चर्चेत आला आहे. त्याने शनिवारी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने हृतिकच्या आयकॉनिक कोई मिल गया या चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला. त्याच्या या व्हिडिओ ला चाहत्यांनी मोठ्या संख्येने लाईक केले आहे.
कर्तिकची बहीण कृतिका देखील यामध्ये दिसते. त्याने हृतिक सारखा अभिनय करून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कोई मिल गया चित्रपटात जेव्हा हृतिक प्रितीला त्याच्या वडिलांचा संगणक दाखवत असतो त्यावेळचा हा सीन आहे.