महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोना विरुध्द लढाईसाठी कार्तिक आर्यनने दिली पीएम निधीसाठी देणगी - कोरोना विरुध्द लढाईसाठी कार्तिक आर्यनने दिली पीएम निधीसाठी देणगी

आज मी जे काही कमवले आहे ते भारतीयांच्याकडूनच आहे. त्यामुळे अशा प्रसंगी मदत करण्याची माझी जबाबदारी असल्याचे सांगत आज मी जे काही कमवले आहे ते भारतीयांच्याकडूनच आहे. त्यामुळे अशा प्रसंगी मदत करण्याची माझी जबाबदारी असल्याचे सांगत कार्तिक आर्यनने पंतप्रधान निधीसाठी एक कोटीची मदत केली आहे.

kartik-aryan-donate-1 crore
कार्तिक आर्यनने दिली पीएम निधीसाठी देणगी

By

Published : Mar 30, 2020, 8:02 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासठी सर्व थरातून मदतीचा ओघ पंतप्रधान निधीसाठी सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटीजनी आपला मदतीचा हात पुढे केलाय. यात अभिनेता कार्तिक आर्यनही सामील झाला. त्याने सोशल मीडियावरुन याची माहिती दिलीय. आज मी जे काही कमवले आहे ते भारतीयांच्याकडूनच आहे. त्यामुळे अशा प्रसंगी मदत करण्याची माझी जबाबदारी असल्याचे त्याने म्हटलंय.

कार्तिक आर्यनने पंतप्रधान निधीसाठी एक कोटीची मदत केली आहे. त्याने ट्विटरवर म्हटलंय, ''एक राष्ट्र म्हणून उभे राहण्याची आवश्यकता आहे. मी आज जो काही आहे, जे काही कमवले आहे ते केवळ भारतीयांच्यामुळे आहे. मी पंतप्रधान निधीसाठी १ कोटी देत आहे. मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना मदतीसाठी आग्रह करीत आहे.''

कार्तिकच्य या कृतीचे भरपूर कौतुक होत असून या ट्विटवर भरपूर कॉमेंट्स आल्या आहेत. इतर कलाकारांनीही पंतप्रधान निधीसाठी देणगी दिली आहे. यात अक्षय कुमार, गुरू रंधावा, भूषण कुमार, कपिल शर्मा आणि वरुण धवन यांची नावे अग्रणी आहेत. सुपरस्टार शाहरुख आणि आमिर खानने अद्याप याबद्दल जाहीर केलेले नाही. मात्र सलमान खानने २५ हजार रोजंदारीवरील कामगारांसाठी मदतीची घोषणा केली आहे.

भारतात कोरोना व्हायरमुळे संक्रमित झालेल्यांची संख्या १००० च्या घरात पोहोचली आहे. १०१४ लोकांना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत २७ लोकांचा प्राण गेलाय. यातून ९६ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. कोराना व्हायरसची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details