मुंबई -सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच, नागरिकांना सुरक्षा पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन, माधुरी दिक्षित, आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसह बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे.
कार्तिक आर्यनने आपल्या हटके स्टाईलमध्ये व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा सलमान खानने 'असा' केला उपयोग, पाहा व्हिडिओ
अमिताभ बच्चन यांनी देखील व्हिडिओद्वारे खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अनिल कपूर यांनी हात धुण्याविषयी माहिती दिली आहे. तर, माधुरी दिक्षितने खोकताना रुमाल किंवा टिशू पेपरचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोष्टीक अन्न खाण्याविषयी सांगितले आहे.