महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

क्रिकेटवर आधारित चित्रपटात काम करणार कार्तिक आर्यन? - कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट

कार्तिक आर्यन यांच्याकडे प्रोडक्शनच्या विविध टप्प्यात अनेक चित्रपट आहेत. थ्रिलरपासून ते हॉरर-कॉमेडीपर्यंत त्याच्याकडे चित्रपटाची रांग आहे. पण त्याची खरी कसोटी लागणार आहे ती आगामी स्पोर्ट्स ड्रामासाठी.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन

By

Published : Apr 8, 2021, 4:31 PM IST

मुंबई - कार्तिक आर्यनची रोमँटिक हिरो अशी प्रतिमा तयार झाली आहे. मात्र ही इमेज त्याला बदलावी लागणार आहे. आपण त्याला विनोदी, अॅक्शन थ्रिलर चित्रपटात पाहिले आहे. आता तो स्पोर्ट्स फिल्म करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकचा आगामी चित्रपट क्रिकेट खेळावर आधारित असणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने बनणार आहे. यासाठी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचा शोध सुरू आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' चित्रपटाचा दिग्दर्शक शरण शर्मा करणार आहे. हा चित्रपट सध्या प्री प्रॉडक्शनच्या स्थितीत असून हा चित्रपट कोणाचाही बायोपिक असणार नाही. यासाठी कार्तिक आर्यनची निवड झाल्याचे समजत असले तरी त्याने अद्याप चित्रपट साईन केलेला नाही. सर्वकाही सुरळीत पार पडले तर यावर्षीच्या सुरूवातीला चित्रपटाचे शुटिंग सुरू होऊ शकेल.

दरम्यान कार्तिक आर्यन आगामी 'भुल भुलैय्या २' या चित्रपटात काम करीत आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटात कियारा अडवानी आणि तब्बू यांच्या भूमिका असतील. २००७ मध्ये आलेल्या 'भुल भुलैय्या' चित्रपटाचा हा सिक्वेल असेल. याशिवाय 'दोस्ताना २' आणि 'धमाका' हे दोन चित्रपटातूनही तो काम करीत आहे.

हेही वाचा - 'तू म्हणशील तसं' नाटक शंभरीपार करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाईची खास मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details