मुंबई- लुका छुपी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच पती पत्नी और वो चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिकनं या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून आता त्याने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.
कार्तिकनं शेअर केला 'पती पत्नी और वो'च्या सेटवरील फोटो - चिंटू त्यागी
या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार असून चित्रपटात कार्तिक चिंटू त्यागीची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा १९७८ मध्ये आलेल्या पती पत्नी और वो सिनेमाचाच रिमेक असणार आहे.
या फोटोमध्ये कार्तिक लहान मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. लहान मुलांसोबत सेटवर मेहनत, असं कॅप्शन देत त्यानं हा फोटो शेअर केला आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सुरू आहे. चित्रपटात कार्तिकच्या अपोझिट भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या अभिनेत्री झळकणार आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार असून चित्रपटात कार्तिक चिंटू त्यागीची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा १९७८ मध्ये आलेल्या पती पत्नी और वो सिनेमाचाच रिमेक असणार आहे. 'पती पत्नी और वो' येत्या ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.