मुंबई- बॉलिवूडच्या हँडसम अभिनेता आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला कार्तिक आर्यन लवकरच पती पत्नी और वो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असून सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो सध्या लखनौमध्ये आहे.
लखनौमध्ये 'या' गोष्टीची मजा घेतोय कार्तिक, फोटो केला शेअर - भूमी पेडणेकर
कार्तिकनं लखनौमधील आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो लखनौवी पराठा आणि छोले खाताना दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये कार्तिक म्हणाला, चिंटू त्यागी डायटवर आहे
आता कार्तिकनं लखनौमधील आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो लखनौवी पराठा आणि छोले खाताना दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये कार्तिक म्हणाला, चिंटू त्यागी डायटवर आहे. इन्जॉईंग लखनौ का खाना, असं त्यानं म्हटलं आहे. कार्तिक यात चिंटू त्यागी ही भूमिका साकारणार आहे.
हा चित्रपट 1978 साली आलेल्या पती पत्नी और वो सिनेमाचा रिमेक असणार आहे. यात कार्तिकशिवाय अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यादेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. भूमी यात कार्तिकच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर अनन्या कार्तिकच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत दिसणार आहे.