मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. साराने एक चॅट शोमध्ये आपल्याला कार्तिकला डेट करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आणि यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं गेलं. यामुळे त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं.
हॅपी बर्थडे प्रिंसेस, कार्तिकनं शेअर केला सारासोबतचा फोटो - लव आज कल
आज सारा अली खानचा वाढदिवस आहे. साराच्या या खास दिवशी कार्तिक काय पोस्ट करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता कार्तिकनं सारासोबतचा केक कट करताना आपला एक फोटो शेअर केला आहे.
आज सारा अली खानचा वाढदिवस आहे. साराच्या या खास दिवशी कार्तिक काय पोस्ट करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता कार्तिकनं सारासोबतचा केक कट करताना आपला एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं, हॅपी बर्थडे प्रिंसेस आणि ईद मुबारक (यावेळी न चेहरा लपवता).
मागील वर्षी ईदच्या दिवशी सारा आणि कार्तिकचा चेहरा झाकलेला फोटो समोर आला होता. यामुळेच यावेळी चेहरा न लपवता, असं कार्तिकनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान ही जोडी लवकरच ऑनस्क्रीनही एकत्र झळकणार आहे. इम्तियाज अलीचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा लव आज कल चित्रपटाचा रिमेक असणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच सारा आणि कार्तिकनं या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं.