महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चिंटू त्यागी चले लखनौ, 'पती पत्नी और वो'च्या चित्रीकरणासाठी कार्तिक रवाना - bhumi pednekar

चिंटू त्यागी चले लखनौ, असं कॅप्शन देत कार्तिकनं विमानतळावरील आपला एक फोटो शेअर केला आहे. तो पती पत्नी और वो या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लखनौला जात आहे. हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे.

चिंटू त्यागी चले लखनौ

By

Published : Jul 12, 2019, 1:13 PM IST

मुंबई- इम्तियाज अली दिग्दर्शित एका आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करताच कार्तिक आपला दुसऱ्या चित्रपट 'पती पत्नी और वो' चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट १९७८ मध्ये आलेल्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. याच्याच चित्रीकरणासाठी कार्तिक लखनौला रवाना झाला आहे.

चिंटू त्यागी चले लखनौ, असं कॅप्शन देत कार्तिकनं विमानतळावरील आपला एक फोटो शेअर केला आहे. तर दोन दिवस आधीच भूमी पेडणेकरही याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लखनौला रवाना झाली असून तिनेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विमानतळावरील फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती.

चिंटू त्यागी चले लखनौ

या चित्रपटात भूमी आणि कार्तिकशिवाय अनन्या पांडेदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने हे त्रिकूट पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'पती पत्नी और वो' चित्रपटाचं दिग्दर्शन मुदसर अजीज हे करणार असून त्यांनी आतापर्यंत दुल्हा मिल गया, हॅपी भाग जाएगी आणि हॅपी फिर भाग जाएगीसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट येत्या ६ डिसेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details