मुंबई- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नसून यात त्याच्या अपोझिट सारा अली खानची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण झालं.
VIDEO: शूटींगदरम्यान कार्तिकला मिळाली नवी मैत्रीण, हात सोडायचं घेईना नाव
आता कार्तिकने मनालीतील आणखी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक लहान मुलांसोबत खेळताना आणि मस्ती करताना दिसत आहे. मस्तीतच त्याने एका लहान मुलीचा हात पकडला आहे.
यानंतर कार्तिक आणि सारानं सेटवरील काही फोटोही शेअर केले होते. अशात आता कार्तिकने मनालीतील आणखी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक लहान मुलांसोबत खेळताना आणि मस्ती करताना दिसत आहे. मस्तीतच त्याने एका लहान मुलीचा हात पकडला आहे. ती कार्तिकला वारंवार आपला हात सोडण्यासाठी सांगत आहे. मात्र, कार्तिक तिची चेष्टा करत तूच माझा हात पकडला असल्याचं म्हणत आहे.
माझ्या नवीन खास मित्रांसोबत खेळताना, असं कॅप्शन देत कार्तिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान इम्तियाज अलीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असून हा चित्रपट २०२० मध्ये १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.