मुंबई -बॉलिवूडचा हार्टथ्रोब कार्तिक आर्यन त्याच्या क्रेझी महिला फॅन फॉलोइंगसाठी ओळखला जातो. तो जिथेही जातो तिथे त्याला महिला फॅन्स घेरतात. मुंबई विमानतळावर त्याला असेच घेरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तो एका विचित्र परिस्थितीत अडकला होता. कार्तिकच्या दोन महिला चाहत्यांनी त्याला पकडण्यासाठी आणि प्रसारमाध्यमांसमोर गुलाब देण्यासाठी धाव घेतली. हे दृष्य कॅमेऱ्यात मिळवण्यासाठी हौशी फोटोग्राफर्सची धांदल उडाली होती.
कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे ज्यामध्ये तो गुलाबी रंगाचा हुडी आणि खाकी पँट घातलेला दिसत आहे. हुडी आणि मास्क घालून कार्तिकने गुपचुप जाण्याचा प्रयत्न केला परंतु मीडियाच्या उपस्थितीमुळे इतरांना विमानतळावर त्याच्या उपस्थितीची जाणीव झाली. कार्तिक बॉडीगार्ड घेऊन चालत असताना दोन मुली हातात गुलाब घेऊन त्याच्याकडे धावत आल्या.