मुंबई - कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती देखील केली. आता जनतेला आर्थिक मदत मिळावी यासाठी देखील कलाकार पुढे सरसावले आहेत.
‘पंतप्रधान मदत निधी’साठी अक्षय कुमार पासून तर कार्तिक आर्यन पर्यंत बऱ्याच कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन याने एक कोटी रुपयांची मदत केली आहे. इतरांनीही शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन त्याने आपल्या पोस्ट मधून केले आहे.
कार्तिकने याबाबत एक ट्विट केले आहे. “कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या अशा प्रतिकूल परिस्थितीत आज आपण एकमेकांची मदत करायला हवी. देशातील नागरिकांमुळे मी आजवर इथे पोहचलो आहे. माझ्या बचतीमधले काही पैसे मी पंतप्रधान मदत निधीमध्ये दान करत आहे.” असे त्याने लिहले आहे.