जयपूर - अभिनेता कार्तिक आर्यन सध्या 'भुलभुलैय्या-२' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जयपूर शहरात आहे. शहरात थंडी प्रचंड असून यातून वाचण्यासाठी तो चाहत्यांसोबत फुटबॉल खेळताना दिसत असून, त्याचा त्याने व्हिडिओ केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिलंय, ''फुटबॉल सेशनच्या मदतीने राजस्थानच्या थंडीवर मात करताना.''
अनिस बझ्मी दिग्दर्शन करीत असलेल्या 'भुलभुलैय्या - २' चित्रपटात कियारा अडवाणी त्याची सहकलाकार आहे.
प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित भुलभुलैय्या हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. १९९३ मध्ये आलेल्या 'मनिचित्राथाजु' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेकहोता.
'भुलभुलैय्या-२' ची निर्मिती भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार करीत असून ३१ जुलै २०२०ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.