महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करिश्मा कपूरची बॉलिवूडमध्ये ३० वर्षे, शेअर केला हिट गाण्यांचा फ्लॅशबॅक व्हिडिओ - video of Karisma Kapoor's hit songs

अभिनेत्री करिश्मा कपूरला हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. २१ जून १९९१ रोजी करिश्माचा पहिला 'प्रेम कैदी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन दशके तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने आपल्या हिट गाण्यांचा फ्लॅशबॅक व्हिडिओ शेअर केला आहे.

Karisma Kapoor
करिश्मा कपूर

By

Published : Jul 1, 2021, 4:19 PM IST

मुंबई- अभिनेत्री करिश्मा कपूरने गुरुवारी तिच्या हिट गाण्यांची फ्लॅशबॅक व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करुन बॉलिवूडमधली ३० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. क्लिप सोबत असलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "९० च्या दशकापासून आतापर्यंतच्या आठवणी. हॅशटॅग ३० वर्षांचा कृतज्ञता."

व्हिडिओ क्लिपमध्ये करिश्मा कपूरच्या नव्वद आणि २००० च्या दशकातील 'हिरो नंबर 1', 'कुली नंबर 1', 'दिल तो पागल है', 'जुबैदा', 'दुल्हन हम ले जाएंगे', 'हम साथ' यासारख्या लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. 'साथ हैं', 'राजा बाबू' आणि 'अंदाज अपना अपना' इत्यादींचा मॅश अप दाखवण्यात आला आहे.

२१ जून १९९१ रोजी करिश्माचा पहिला 'प्रेम कैदी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन के मुरली मोहन राव यांनी केले होते आणि अभिनेता हरीशची यात मुख्य भूमिका होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'मेंटलहुड' या तिच्या पहिल्या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री करिश्मा अखेरची स्क्रीनवर दिसली होती.

तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओला भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉलिवूडमधील तिच्या काही सहकाऱ्यांनी कॉमेंट्सही केल्या आहेत.

सोनम कपूरची बहीण रिया कपूरने आपल्या कॉमेंटमध्ये 'फॅशन आयकॉन' असे करिश्माला उद्देशून लिहिले आहे. मलायका अरोरा आणि माहीप कपूर यांनी हार्ट इमोजिस टाकून प्रतिक्रिया दिली आहे.

तिच्या चाहत्यांनीही तिच्या इंस्टाग्राम पेजवरही भाष्य केले की, "तू छान आहेस. तुझे सर्व चित्रपट पाहणे आम्हाला आवडले आहे. तू परत यायला हवे."

एका चाहत्याने लिहिले, " तू एक अशी अद्भुत अभिनेत्री आहेस, तुला रुपेरी पडद्यावर मिस करतो आहोत."

हेही वाचा - लष्करी अधिकाऱ्याची मुलगी ते सुशांतसिंह राजपुत आत्महत्या, या कारणांमुळे रिया राहिली चर्चेत

ABOUT THE AUTHOR

...view details