मुंबई- कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर बऱ्याच कलाकारांनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. यामध्ये अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, करीना कपूर, कंगना रनौत, शाहरुख खान यांच्याशिवाय इतर बऱ्याच कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे. आता अभिनेत्री करिश्मा कपूर देखील मदतीसाठी पुढे सरसावली आहे.
करिष्माने सोशल मीडयावरून पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. आपल्या मुलांना सोबत घेऊन ही मदत करत असल्याचे तिने म्हटले आहे. पीएम आणि सीएम रिलीफ फंड मध्ये तिने मदत केली असल्याचे सांगितले. तिने नेमकी किती मदत केली याबाबत उल्लेख केलेला नाही.