महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जेह'च्या पहिल्या वाढदिवशी करीनाने पोस्ट केला मुलाचा अनोखा फोटो - करीना मुलगा जेह वाढदिवस

करीना कपूर खानचा धाकटा मुलगा जेह अली खान आज एक वर्षाचा झाला आहे. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर एक मोहक फोटो आणि वाढदिवसाची नोट पोस्ट केली आहे. करीनाने २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले. चार वर्षांनंतर २०१६ मध्ये दोघांना त्यांचा पहिला मुलगा तैमूरचा आशीर्वाद मिळाला आणि गेल्या वर्षी जेह या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला.

करीनाने पोस्ट केला मुलाचा अनोखा फोटो
करीनाने पोस्ट केला मुलाचा अनोखा फोटो

By

Published : Feb 21, 2022, 2:53 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर लहान मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिचा धाकटा मुलगा जेह अली खान आज एक वर्षाचा झाला आहे. तिने जेहसोबत तिच्या पहिला मुलगा तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत तैमुरचा भाऊ जमीनीवर रांगताना दिसत आहे.

फोटोला एक आनंदी स्पर्श देत करीनाने त्याला कॅप्शन दिले, "भाई, आज मी एक वर्षाचा झालो आहे माझ्यासाठी थांबा..चला एकत्र जग एक्सप्लोर करूया...अर्थातच अम्मा आपल्या सर्वत्र फॉलो करत आहे...वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या जेह बाळा...."

करीनाने पोस्ट केला मुलांचा अनोखा फोटो

करीनाने हा फोटो शेअर करताच चाहते आणि चित्रपट क्षेत्रातील लोक जेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये आले. "जेह बाबा," अशी अभिनेत्री अमृता अरोरा हिने टिप्पणी केली व त्यात लाल हृदयाच्या इमोजीची स्ट्रिंग जोडली. सैफ अली खानची बहीण सबा हिने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा जेह जान. तुझ्यावर नेहमीच प्रेम राहिल."

करीना आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केले. चार वर्षांनंतर, 2016 मध्ये दोघांना त्यांचा पहिला मुलगा तैमूरचा आशीर्वाद मिळाला आणि गेल्या वर्षी जेह या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला.

दरम्यान चित्रपटाच्या आघाडीवर करीना आगामी ''लाल सिंग चड्ढा''मध्ये आमिर खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. ती सुजॉय घोषच्या आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे जे जपानी लेखक केगो हिगाशिनोच्या सर्वात प्रशंसित ''द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स''चे स्क्रीन रूपांतर आहे. करीना शिवाय या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा -Prabhas Treats Big B : ''बच्चन झाले प्रसन्न''!! प्रभासने बिग बीसाठी आणले स्वादिष्ठ घरगुती जेवण

ABOUT THE AUTHOR

...view details