मुंबई - बॉलिवूड स्टार करीना कपूर खान चित्रपट निर्माते सुजॉय घोष दिग्दर्शित नेटफ्लिक्स चित्रपटाद्वारे तिचे ओटीटी पदार्पण करणार आहे, असे स्ट्रीमरने बुधवारी जाहीर केले आहे. अद्याप शीर्षक ठरले नसलेला हा रहस्यमय चित्रपट 2005 च्या जपानी बेस्टसेलर द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स ( The Devotion of Suspect X ) या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात करीनासह जयदीप अहलावत आणि विजय वर्मा हे कलाकार देखील असतील.
विद्या बालन-स्टारर 'कहानी' आणि तापसी पन्नूचा 'बदला' यांसारख्या थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखले जाणारे घोष म्हणाले की, या चित्रपटासाठी प्रशंसित लेखक केगो हिगाशिनो यांच्या कादंबरीचे रुपांतर करण्यास मी उत्सुक आहे. ही कादंबरी मी वाचलेली सर्वोत्कृष्ट प्रेमकथा आहे आणि तिला चित्रपटात रूपांतरित करण्याची संधी मिळणे हा एक सन्मान आहे. शिवाय, मला करीना, जयदीप आणि विजय यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे! कोणी याहून अधिक आणखी काय मागू शकेल. ", दिग्दर्शकाने एका निवेदनात म्हटले आहे.