महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करिना कपूरने शेअर केली बहिण करिश्मासोबतच्या विकेंड सेलेब्रिशनची झलक - करिना कपूर आणि करिश्मा खाद्य प्रेमी

अभिनेत्री करिना कपूर खानने आपल्या प्रॉडक्टीव्ह विकेंडची एक व्हिडिओ झलक शेअर केली आहे. यात ती बहिण करिश्मासोबत असून तोंडाला पाणी सुटेल अशा खाद्या पदार्थांची रेलचेल दिसत आहे.

'productive weekend' with Karisma Kapoor
विकेंड सेलेब्रिशनची झलक

By

Published : Aug 2, 2021, 4:59 PM IST

मुंबई - अभिनेत्री करीना कपूर खानच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नजर टाकली तर ती आणि तिची बहिण करिश्मा या दोघेही खाद्य प्रेमी असल्याचे दिसत आहे. फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने कपूर भगिणी एकत्र आल्या होत्या. त्यांनी आपला क्वालिटी टाईम एकत्र घालवला आणि आवडत्या खाद्य पदार्थांवर ताव मारला.

लोलोसोबत प्रॉडक्टीव्ह वेळ घालवल्याचे करिनाने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.

कपूर बहिणींच्या वीकेंड सेलिब्रेशनला सोशल मीडिया युजर्सनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या पोस्टवर दोघेंचे कौतुक होत असून भरपूर शुभेच्छाही मिळत आहेत.

करिश्मानेही हाच व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. "आमच्या जेवणावर नेहमीच प्रेम करा," तिने क्लिपला कॅप्शन दिले आहे.

वर्क फ्रंटवर करिना आगामी ''लाल सिंह चड्ढा'' चित्रपटामध्ये आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण, म्हणाली- मागील काही दिवस फार संघर्षमय राहिले..

ABOUT THE AUTHOR

...view details