महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सैफ अलीच्या ५० वर्षांचे आयुष्य उलगडणारा व्हिडिओ करिनाने केला शेअर - सैफ आणि करिना

अभिनेत्री करिना कपूरने तिचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने आपल्या नवऱ्याचा म्हणजेच सैफ अली खान याच्या ५० वर्षांच्या आयुष्यावर भाष्य केलंय. ती म्हणाली की व्हिडिओ 22 मिनिटांचा असूनही अद्याप बरेच काही सांगणे बाकी आहे.

Saif and Kareena
सैफ आणि करिना

By

Published : Aug 17, 2020, 9:03 PM IST

मुंबई -बॉलिवूड सौंदर्यवती करिना कपूर खानने तिचा नवरा अभिनेता सैफ अली खानसाठी एक सरप्राईज भेट दिली आहे. तो ५० वर्षांचा झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात सैफचा ५० वर्षांचा प्रवास टिपला आहे.

या व्हिडिओ क्लिपमध्ये सैफच्या जन्मापासूनच त्याची किशोरावस्था, आपली मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचे केलेले स्वागत, करिनासोबतचे क्षण आणि सैफच्या जीवनातील अनेक घडामोडींसोबत तैमुरचे स्वागत या गोष्टींचा समावेश आहे.

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सैफच्या ५० वर्षानिमित्त एक व्हिडिओ तयार केलाय. तो काल मी सर्वांसाठी शेअर केला. २२ मिनिटांचा हा व्हिडिओ आहे, तरीही अजून बरेच काही सांगणे बाकी आहे. मी इथे त्याची एक झलक शेअर करीत आहे. व्हिडिओतील ५० चित्रे मनापासूनची आहेत." असे म्हणत त्याच्या पन्नाशीचे तिने कौतुक केलंय.

करिनाने एक फोटोही शेअर केला आहे ज्याचे तिने मोन्टाज केला आहे. यात सैफ आणि तैमूर टशन चित्रपट पाहात आहेत.

२००८ मध्ये टशनच्या शूटिंग दरम्यान सैफ आणि करिना प्रेमात पडले होते. या दोघांनी एलओसी कारगिल, ओंकारा, एजंट विनोद आणि कुरबानसारख्या चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details