हैदराबाद- बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करीनाने प्राणघातक कोरोना व्हायरसवर मात केली आहे. करीना गेल्या 14 दिवसांपासून क्वारंटाईनमध्ये होती. कोरोनामधून बरी झाल्यानंतर करीना पती सैफ अली खान खान आणि तिच्या दोन मुलांसोबत ख्रिसमस डे साजरा करण्यासाठी बाहेर पडली आहे. करीना फॅमिलीसोबत लंच करताना दिसली.
करीना कपूर ख्रिसमस पार्टी करीना कपूर 13 डिसेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. तिने चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरातील पार्टीला हजेरी लावली होती. तिच्यासोबत अभिनेत्री अमृता अरोराचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याचवेळी सीमा खान आणि महीप कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सध्या या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.
करीना कपूर ख्रिसमस पार्टी कोरोनामधून बरी होताच करीना ख्रिसमस पार्टी साजरी करण्यासाठी बाहेर गेली आहे. पहिल्यांदा करिनाने शनिवारी पती सैफ अली खान, मोठा मुलगा तैमूर आणि लहान मुलगा जेहसोबत जेवण केले. सैफ कुटुंबाच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे.
करीना कपूर ख्रिसमस पार्टी ख्रिसमस पार्टीमध्ये करीनाने काळ्या रंगाच्या टी-शर्टसोबत तपकिरी टॅन पँट घातली आहे. सैफ निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसला. तैमूरने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. जेह आई करीनाच्या मांडीवर दिसत होता. जेहने स्काय शर्ट आणि शॉर्ट डेनिमवर शूज घातले आहेत.
हेही वाचा -"मला 'भारता'च्या नावाने ओळखले जावे हे 'स्वप्न होते"