हैदराबाद -बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखला जाणारा कार्तिक आर्यन यांच्या ग्लमरस लुकने मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटमध्ये चार चांद लावले. हैदराबाद येथे डिझायनर मनिष मल्होत्रासाठी दोघांनी स्टायलिश अंदाजात रॅम्पवॉक केला. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मनीष मल्होत्रानेही त्यांचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
करिना कपूर खानने या इव्हेंटमध्ये फक्त सर्वांचे लक्षच वेधले नाही, तर आपल्या अदांनी उपस्थितांची मनेही जिंकली. कार्तिकनेही आपल्या लुकने सर्वांना आकर्षित केले. विवाह समारंभातील ड्रेसच्या प्रदर्शनासाठी हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा -करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटाची पहिली झलक, प्रदर्शनाची तारीख ठरली