मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची प्रसिध्द कलाकार करिना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केली आहेत. दोघांनीही 'रिफ्यूजी' या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. याला आता २० वर्षांचा काळ उलटला आहे. दोघांनीही सोशल मीडियावरुन याची आठवण ठेवत पोस्ट शेअर केल्या आहेत.
करिनाने या २० वर्षात अनेक हिट चित्रपट दिले. तिने आपल्या करियरची सुरूवात 'रिफ्यूजी' चित्रपटाने अभिषेक बच्चनसोबत केली होती. त्यानंतर तिने 'कभी खुशी कभी गम', 'हिरोइन,' जब वी मेट ', 'अंग्रेजी मीडियम', '3 इडियट्स', 'उड़ता पंजाब' आणि 'बजरंगी भाईजान' यासारख्या हिट चित्रपटातून भूमिका केल्या. २० वर्षे पूर्ण होत असताना सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 'रिफ्यूजी' सिनेमातील तिच्या पहिल्या सीनचा आहे.
करिनाने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की हा योग्य निर्णय होता. इंडस्ट्रीमध्ये २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिषेकनेही एक फोटो शेअर करुन आपला आनंद व्यक्त केलाय. या फोटोला त्याने #RoadTo20 हे शीर्षक दिलंय. यामध्ये त्याने साकारलेल्या व्यक्तीरेखा दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत त्याने एक भावुक पोस्ट लिहिली आहे.