मुंबई - सध्या बरेच कलाकार लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ एन्जॉय करत आहेत. या वेळेत हे कलाकार आपल्या छंदाना वाव देत आहेत. अभिनेता सैफ अली खान देखील सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याने करिनाला एक खास क्वारंटाईन गिफ्ट दिले आहेत. करिनाने सोशल मीडियावर सैफने दिलेल्या गिफ्टचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.
लॉकडाऊन दरम्यान कलाकार वेगवेगळ्या गोष्टी घरी बसून करून पाहत आहेत. सैफला बागकाम करण्याची फार आवड आहे. त्यामुळे त्याने करिनाला आपल्या बागेतील भिंतीवर फुलांचे चित्र काढून भेट दिली आहे.
'क्वारंटाईन गिफ्ट असावं तर असं'; करिनाला सैफकडून मिळाले खास गिफ्ट, पाहा फोटो - kareena latest news
लॉकडाऊन दरम्यान कलाकार वेगवेगळ्या गोष्टी घरी बसून करून पाहत आहेत.
'क्वारंटाइन गिफ्ट असावं तर असं'; करिनाला सैफकडून मिळाले खास गिफ्ट, पाहा फोटो
सैफ सोबतच तिने तैमुरचा देखील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तैमूर देखील भिंत रंगवताना दिसतो.