हैदराबाद: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने इंस्टाग्रामवर एक सेल्फी पोस्ट केला आहे. यात दिसते की ती एका आघाडीच्या क्रीडा फ्रेंचायझीसाठी शूट करत होते. यात तिने आपले बेबी बंप दाखवले असून सामान्य महिलांसारखे तीदेखील गरोदरपणामध्ये आपल्या कामात बिझी असून ती आपल्या वाढणाऱ्या बाळाची काळजीही घेत आहे.
इन्स्टाग्रामवर तिने सेटवरील फोटो शेअर केला असून तिने लिहिलंय की, "आम्ही पुमा इंडियाच्या सेटवर आहोत." फोटोत ती गुलाबी रंगाच्या स्पोर्ट्सवेअरमध्ये प्रेग्नन्सी ग्लो दाखवताना दिसत आहे.
या फोटोला तिच्या चाहत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून केवळ तासाभरात साडेपाच लाख लोकांनी फोटोला लाईक केले आहे.
करिना देणार दुसऱ्या बाळाला जन्म