महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करिना कपूरने दिल्लीत पूर्ण केले 'लालसिंग चड्ढा'चे शुटिंग - Kareena's first look in 'Lal Singh Chadha'

करिना कपूरने 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे दिल्लीत शुटिंग संपवले आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ती दिल्लीत शूट करीत होती. आमिर आणि करीना कपूर खान अभिनीत 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

Aamir and Kareena Kapoor Khan
आमीर आणि करीना कपूर खान

By

Published : Oct 15, 2020, 3:45 PM IST

मुंबई- एकीकडे आमिर खानच्या 'लालसिंग चड्ढा' चे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्याचवेळी निर्माते चित्रपटाचे शूटिंग लवकर संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता अभिनेत्री करिना कपूर खानने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सप्टेंबर अखेरीस करिना शूटिंगसाठी दिल्लीला पोहोचली होती. काल तिने सिनेमाचे शुटिंग संपवले.

सर्व आवश्यक नियमांचे पालन करत आमीर खानने चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले होते. करिनाची गर्भधारणा लक्षात घेऊन शूट दरम्यान सावधगिरीचे आणि सेफ्टीचे निकष पाळण्यात आले.

गेल्या वर्षी आमिरने करिनाचा 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटातील पहिला लूक रिलीज केला होता, त्यात अभिनेत्री सलवार कमीज आणि बिंदीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आणि तेव्हापासून फॅन चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट्सवर लक्ष ठेवून आहेत.

आमीर आणि करिना कपूर खान अभिनीत 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे आणि हा 1994 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रीमेक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details