मुंबई - सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर चित्रपट निर्माता करण जोहर सोशल मीडियावर टीकेचा धनी बनला आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देत स्टार किड्सला तो संधी देतो, असा आरोप त्याच्यावर प्रेक्षकांसह बॉलिवूडमधील काही सेलेब्स करीत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण वादावर नाराज असलेल्या करणने 'मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज' (मामी ) नावाच्या प्रसिद्ध चित्रपट संस्थेचा राजीनामा दिला आहे.त्याने मेल करुन हा राजीनामा पाठवून दिलाय. दीपिका पदुकोण करणला या निर्णयापासून रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याची बातमी आहे.
मामीच्या पॅनेलमध्ये विक्रमादित्य मोटवाणी, सिद्धार्थ रॉय कपूर, झोया अख्तर आणि कबीर खान देखील आहेत. भूतकाळात ट्रोलिंगमुळे कंटाळलेल्या अनेक मुख्य कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या कमेंट्स सेक्शनमध्ये मर्यादित ठेवल्या आहेत.
करणची इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्ट 14 जून रोजी सुशांतच्या आत्महत्येची बातमी आल्यानंतर होती. करणने सुशांतच्या निधनाबद्दल एक पोस्ट लिहिली होती, सुशांतशी संवाद साधू शकलो नाही याबद्दल त्याने स्वत: ला या घटनेसाठी जबाबदार मानले होते.
करण व्यतिरिक्त आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, सोमण कपूर आणि सलमान खान इत्यादींवर सोशल मीडियामध्ये घराणेशाही आणि स्टार पॉवर प्ले या विषयावर जनतेचा रोष आहे.